हातावरची ही रेषा सांगते तुमच्या आजारांविषयी

आपण अनेकदा ऐकलं असेल की, हातावरील रेषा आपलं भविष्य सांगतात.

हातावरील रेषा तुमच्या आरोग्याविषयीही सांगतात, असं तुम्ही कदाचित ऐकलं नसेल?

तळहातावर अशा काही रेषा आहेत, ज्या आपल्या आजारांबद्दल सांगतात.

अगोदर जाणून घेऊ तळहातावर नेमक्या किती रेषा असतात.

तळहातावर जीवन, मस्तिष्क, हृदय, सूर्य, भाग्य, स्वास्थ्य, विवाह अशा 25 रेषा असतात.

ज्या लोकांच्या हृदय रेषेवर गोल द्वीप तयार होतो, त्यांना अचानक चक्कर येण्याचा त्रास होतो.

मेंदूची रेषा ओलांडताना आरोग्य रेषा जर रुंद आणि खोल झाली असेल तर डोकेदुखी जास्त त्रास देते.

आरोग्य रेषेचा रंग पांढरा झाल्यास पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात.

डोक्याची रेषा हृदय रेषा आणि आरोग्य रेषा यांच्यामध्ये अधिक रुंद असेल तर झटका येण्याची समस्या अधिक असते.