सव्वा किलो सोन्याचं जानवं घालतात हे पंडितजी

हिंदू धार्मिक पुस्तकांमध्ये आपण अनेकदा 'एक गरीब ब्राह्मण...' असं ऐकतो.

गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात राहणारे गुरुजी विजय जोशी यांनी हे चुकीचं सिद्ध केलं आहे.

वडोदरातील मालसर गावातील गजानन आश्रमाचे गुरुजी 1.25 किलो सोन्याचं जानवं धारण करतात.

एवढेच नाही तर ते कमरेला पिस्तूलही ठेवतात.

त्यांच्या आश्रमात नर्मदेची प्रदक्षिणा करणाऱ्या यात्रेकरूंना निवास आणि मोफत भोजन दिले जाते.

भारताव्यतिरिक्त आफ्रिकन देशांमध्येही त्यांचे अनेक अनुयायी आहेत.

विजयभाई हे गणपतीचे मोठे उपासक आहेत.

राजकोटमधील त्यांच्या घराचे नाव विघ्नराज आहे.

एखाद्या कथेतील ब्राह्मणाप्रमाणे ते बिलकूल गरीब किंवा गरजू नाहीत.

त्यांच्या कार्याबरोबरच ते श्रीमंतीसाठीही प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत.

ते अनुयायांना यश, कीर्ती, संपत्ती आणि दीर्घायुष्याचा आशीर्वाद देतात.