अंत्यसंस्कार झाल्यानंतरही जळत नाही शरीरातील हा भाग!
हिंदू धर्मात मृत व्यक्तीला अग्नी दिला जातो. पार्थिवाला अग्नी दिल्यावर ते शरीर पंचत्वात विलीन होतं.
अंत्यसंस्कारावेळी मृतदेहाला आग लावल्यानंतर शरीराचा एकेक अवयव जळून खाक होतो.
हाडेदेखील जळून राख होतात. काही हाडं उरतात आणि ती नंतर नदीत विसर्जित केली जातात.
शरीराचा एक भाग असा असतो जो अंत्यसंस्कारांनंतरही जळत नाही.
अंत्यसंस्कार झाल्यानंतरही जळत नाही अशा शरीराच्या भागाविषयी तुम्हाला माहितीय का?
शरीराचा हा भाग दात आहे, जो जाळल्यानंतरही जळत नाही.
शास्त्रज्ञांच्या मते दात न जळण्यामागे विज्ञान आहे.
दात कॅल्शियम फॉस्फेटचे बनलेले असतात आणि त्यामुळे त्यांना आग लागत नाही.
अंत्यसंस्काराच्या वेळी, दाताच्या सर्वांत मऊ ऊती आगीत जळतात, तर सर्वांत कठीण ऊती जळत नाहीत.