या ठिकाणी मुलींना मुद्दाम बनवतात जाड, हे आहे कारण!
लग्न आणि लग्नाच्या विचित्र परंपरांविषयी तुम्ही ऐकलंच असेल.
जगात अशा अनेक प्रथा परंपरा आहेत ज्यांविषयी काहींना माहितही नसतं.
अशीच परंपरा आहे जिथे मुलींना खायला घालून लग्नासाठी जाड बनवलं जातं.
मुलींचं लग्नाचं वय झालं की त्यांना खूप खाऊ-पिऊ घालतात, जेणेकरून त्यांचं वजन वाढेल.
या प्रथेला ‘लेबलू’ म्हणतात. ही पश्चिम आफ्रिकेतल्या मुर्तानिया देशातली प्रथा आहे.
मुली लग्नाच्या झाल्या मुर्तनियामध्ये मुलींना खाऊ घालून जाड बनवलं जातं.
वर्षानुवर्षं चालत आलेल्या या प्रथेचं पालन प्रत्येक मुलगी करते. ही प्रथा मुलींना सुंदर बनवण्यासाठी आहे.
लठ्ठपणा मुलींचं सौंदर्य आहे, तर पोटावरची चरबी आणि स्ट्रेच मार्क्स हे सौंदर्याचं लक्षण असल्याचं तिथे मानलं जातं.
मुलगी जितकी जाड तितकीच जास्त जागा तिला पतीच्या हृदयात मिळेल, असं मुर्तानियामध्ये म्हटलं जातं.