शांत झोप येत नसेल तर काय उपाय करावा?

दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री शांत आणि चांगली झोप महत्त्वाची आहे. 

झोपेदरम्यान, हृदय आणि रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. यामुळे त्यांना आरोग्यदायी राहण्यास मदत होते.

झोपेच्या अभावामुळे हृदयरोग, किडनीचा आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

चांगली झोप शरीराला संतुलित आणि आरोग्यदायी ठेवण्यास खूप महत्त्वाची आहे.

डोक्यावर आणि पायावर तेलाने मालिश केल्याने चांगली झोप येते.

वेळेवर झोपण्यासाठी बेडवर जाणे चांगल्या झोपेसाठी आवश्यक आहे.

दररोज गरम दूध प्यायल्याने चांगली झोप येते. 

एक कप गरम दूधात केसर टाकून प्यावे.

झोपण्यापूर्वी जीऱ्याचा चहा हा चांगली झोप येण्यास मदत करतो.