कंबरदुखीचा होतोय त्रास, तर आधी हे काम करा

धावपळीच्या या जीवनात अनेकांना आता कंबर दुखीचा त्रास जाणवतो.

विशेष करुन कंबर दुखीचा त्रास हा महिलांमध्ये अधिक दिसून येत आहे.

महिलांच्या प्रसूतीनंतर त्यांचे शरीर आधीच्या तुलनेत जास्त ताकदवान राहत नाही.

प्रसूती काही सामान्य बाब नाही. यामुळे महिलांच्या शरीरावर मोठा परिणाम होतो.

विशेष करुन पाठीखालचा भाग थोडा अशक्त होतो.

किचनमध्ये उभे राहून जेवण बनवणे हेसुद्धा कंबर दुखण्याचे एक कारण आहे. 

शरीरात पोटॅशिएम, फॉस्फोरस आणि कॅल्शिअमची कमी असते.

तेव्हा कंबरदुखीचा त्रास आणखीनच वाढतो. 

यामुळे पोटॅशिएम, फॉस्फोरस आणि कॅल्शिअमची कमी होऊ देऊ नये.