नागपुरातील प्रसिद्ध 8 पर्यटनस्थळे!

टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आणि संत्रा नागरी अशी नागपूरची ओळख असून दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात.

नागपूर शहरापासून 15 किमी अंतरावर कामठी येथील प्रसिध्द ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे बुद्धविहार आहे.

जगभरातील बौद्धधर्मीय आणि लक्षावधी आंबेडकर अनुयायांसाठी नागपुरातील दीक्षाभूमी हे एक पवित्र स्थान आहे.

महाराष्ट्रातील सर्वात जुने संग्रहालय म्हणून ओळख मध्यवर्ती संग्रहालयाची ओळख आहे.

नागपूर शहरापासून अवघ्या 20 किमी अंतरावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आहे.

नागपूर शहरापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेले धापेडवाडा येथे स्वयंभु विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे.

विदर्भातील रामटेक हे हिंदू धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थळ मानले जाते.

नागपूर जिल्ह्यातील रामटेकपासून सुमारे सात किमी अंतरावर असलेला नगरधन किल्ला हा ‘भुईकोट’ प्रकारातील एक उत्तम किल्ला आहे.

हिंदू - मुस्लीम धर्मीयांच्या एकीचे प्रतीक असलेले संत ताजुद्दीन बाबांचे पवित्र श्रद्धास्थळ नागपुरातील ताजबाग भागात आहे.