संक्रांतीनंतर का करतात नदी संगमावर स्नान?

संक्रांतीनंतर का करतात नदी संगमावर स्नान?

नवीन वर्षाची सुरुवात झाली की हिंदू संस्कृतीतील पहिला सण मकर संक्रांत येतो. 

हिंदू धर्मात उत्तरायणातील संगमावरील स्नान विधीला आणि धार्मिक कार्यांना महत्त्व आहे.

कोल्हापुरातील मूर्ती आणि मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी याबाबत माहिती दिली आहे.

भारतीय संस्कृतीतील बरेचसे सण हे पंचांगावर, चंद्राच्या कलांवर तिथींवर अवलंबून असतात. 

मकर संक्रांत हा सण मात्र तारखेवर अवलंबून आणि सूर्याच्या परिभ्रमणाशी संबंधित आहे.

सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि हा काळ पवित्र मानला जातो.

भारतात नदी संगमावर मंदिरे असून या ठिकाणी आवर्जून पवित्र स्नान, पूजापाठ, दानधर्म केले जातात.

दक्षिण भारतात कुंभकोनम, मदुराई, उत्तरेतील प्रयाग याप्रमाणेच नदीचे संगमावर स्नान केले जाते. 

या पर्वकाळात भाविकांची मोठी गर्दी होत असते, अशी माहिती देखील राणिंगा यांनी दिली आहे.

शिवकालीन इशारतीच्या तोफांचा दूर्मिळ खजिना