बाप्पाच्या सजावटीसाठी कृत्रिम फुलांची ‘इथं’  करा खरेदी 

गणेशोत्सवाची तयारी सध्या वेगानं सुरू आहे. गणेशोत्सवाच्या आरास साहित्यानं  फुललीय.

वेगवेगळ्या रंगाच्या माळा, नव्या पद्धतीचे झिरमाळ्या असलेले पडदे यांनी पुण्यातल्या बाजारपेठा फुलल्या आहेत.

घरातल्या बाप्पाच्या मुर्तीला अनुसरुन या बाजारातून आरास साहित्य घेतले जात आहे.

पुण्यातल्या प्रसिद्ध तुळशीबागेत मेड इन इंडिया प्रॉडक्टचीच चलती आहे.

दरवर्षी प्रमाणे फुलांच्या माळा, कृत्रिम विविध रंगांची फुले, कृत्रिम लहान आकारातील गवताचे सेट आरास साहित्यासाठी उपलब्ध आहे.

घरातील गणेशासाठी डेकोरेटिव्ह कागदी फुले, फुलांच्या माळा देखील बाजारात दिसत आहेत.

यात बाप्पाच्या आवडीचे असलेले जास्वंद, कमळ यासह झेंडू, मोगरा, गुलाब अशा विविध प्रकारची फुले आणि माळा दिसत आहेत.

बाप्पाची सजावट करा थ्रीडी!