आता सेल्फी स्टिक  विसरा! मार्केटमध्ये आलंय नवं गॅजेट

अडव्हान्सड टेक्नॉलॉजीमुळे प्रत्येक गॅजेटचा एक काळ असतो.

नवं गॅजेट मार्केटमध्ये येताच लोकांना जुन्या गॅजेटचा विसर पडतो.

असंच एक नवं गॅजेट सेल्फी स्टिकची जागा घेत आहे.

याचं नाव HOVERAir X1 आहे. जे AI आधारित छोटंसं ड्रोन आहे.

विशेष म्हणजे हे गॅजेट तुमच्या हातांच्या इशाऱ्यावर काम करतं.

याच्या माध्यमातून तुम्ही 50 फूटांच्या उंचीवरुन व्हिडिओ कॅप्चर करु शकता.

यासोबतच हवेत ड्रोन जवळपास 24  किमी/तासांच्या वेगाने उडू शकतं.

हे ड्रोन 'जेस्चर कंट्रोल' सुविधेसह काम करते.

या ड्रोनची किंमत जवळपास 44,396 रुपये आहे.