फ्रिज नाहीये? या टिप्स वापरा, उन्हाळ्यातही चांगले राहील दूध!
उन्हाळ्यात बऱ्याचदा जास्त काळ दूध साठवता येत नाही. फ्रिजशिवाय तर अजिबात नाही.
फ्रिज नसल्याने दूध तर खराब तर होतेच, इतर पदार्थही खराब होतात.
उष्णतेमध्ये दुध फाटू नये किंवा नासू नये, यासाठी काही टिप्स वापरा.
दूध उकळण्यासाठी स्वच्छ भांडे वापरावे.
दूध उकळल्यानंतर लगेच थंड ठिकाणी ठेवा.
दुधात अगदी कमी प्रमाणात बेकिंग सोडा मिसळल्याने ते फाटण्याची शक्यता कमी होते.
उन्हाळ्यात दूध फ्रीजमध्ये ठेवा आणि बाहेर काढल्यावर लगेच वापरा.
फ्रीज नसेल तर दिवसातून तीन ते चार वेळा कमी तापमानात दूध उकळवा.
प्रत्येक वेळी 2 ते 3 वेळा उकळल्यानंतरच गॅस बंद करा.
दूध थंड झाल्यावर झाकून ठेवावे. ते पूर्णपणे झाकल्याने दूध खराब होऊ शकते.
तुम्हालाही खूप घाम येतो का? या 5 आजारांचे असू शकते लक्षण, दुर्लक्ष टाळा..
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा