वरुण आता बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच फादर्स डे’ साजरा करत आहे.
आता त्यानं आपल्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
वरुणने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत.
पहिल्या फोटोत वरुणने आपल्या मुलीचा हात हातात घेतला असून त्याबरोबर एक कॅप्शनही लिहिलं आहे.
वरुण म्हणाला, ‘‘हॅप्पी फादर्स डे. माझ्या वडिलांनी आजपर्यंत मला हेच शिकवलंय की हा दिवस साजरा करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे बाहेर जाऊन कुटुंबासाठी काम करायचं.
'एका मुलीचा बाप असणं हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा आनंद आहे.' असं वरुण म्हणाला.
वरुणची ही पोस्ट व्हायरल होत असून त्यावर अनेक स्टार्स देखील कमेंट्स करत आहेत.