32 वर्षांनी वसंत पंचमीला जुळून आलाय दुर्मिळ योग!

यावर्षी बुधवार, 14 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी आहे.

वसंत पंचमी या दिवसाचे महत्त्व मोठे आहे. याच दिवशी देवी सरस्वती उत्पन्न झाली. श्रीलक्ष्मीचाही वसंत पंचमी हाच जन्म दिवस आहे.

या दिवशी रवि आणि शुक्ल या शुभ योगांसोबत रेवती नक्षत्रही आहे.

वसंत पंचमीच्या दिवशी श्रीसरस्वती, श्रीलक्ष्मी आणि  रती-मदन यांची पूजा केली जाते. आपले दांपत्य जीवन सुखसमाधानाचे जावे हा त्यामागचा उद्देश असतो. 

वसंत पंचमीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे

काही ठिकाणी या दिवसापासून लहान मुलांचे विद्यारंभ संस्कार केले जातात.

पालक आपल्या मुलांना सरस्वती मातेची पूजा करायला लावतात.

संपूर्ण सृष्टीत नवचैतन्य निर्माण होण्याचा प्रारंभ याच दिवशी होत असतो. 

वसंत पंचमीला नवीन पालवीच्या व धान्याच्या लोंब्या देवाला वाहण्याची प्रथा आहे.