घरातील वास्तूदोष दूर करण्यासाठी 5 प्रभावी टिप्स

स्वच्छता महत्त्वाची 

असे मानले जाते की, देवी लक्ष्मी नेहमी स्वच्छ ठिकाणी वास करते. देवी लक्ष्मीच्या सान्निध्याने वास्तुदोषांचा प्रभाव दूर होतो. यासाठी नियमित स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे.

शुभ रोपे लावा

घरात झाडे लावल्याने वास्तुदोषांचा प्रभावही कमी होतो. तुळशी, कडुलिंब, मनी प्लांट यांसारख्या वनस्पती घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात.

घरी झोपाळा

वास्तूनुसार घरामध्ये झुला म्हणजेच झोपाळा असल्यानं नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात समृद्धी राहते. झोपाळा घराच्या उत्तरेकडील भागात असावा.

दैनिक पूजेनंतर घंटी वाजवावी

घरामध्ये नित्य पूजा करताना देव्हाऱ्यातील घंटी वाजवणे खूप शुभ मानले जाते. घंटी वाजवल्यानं घरातील वास्तुदोषांचा प्रभाव थांबतो आणि सकारात्मकता येते.

शंख वाजवा

हिंदू धर्मात शंख अत्यंत पवित्र मानला जातो. असे मानले जाते की ज्या घरात शंख असेल तेथे वास्तु दोष नसतात. नियमित शंख फुंकल्याने घरातील नकारात्मकता दूर होते.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही