अशी बनवा सांजाची स्वादिष्ट पोळी

अशी बनवा सांजाची स्वादिष्ट पोळी

घरात अचानक पाहुणे आले आणि अशावेळी गोडधोडाचं काय करावं असा प्रश्न गृहिणींना पडतो. 

पुरणपोळीला पर्याय म्हणून सांज्याची पोळी म्हणजेच सोजीची पोळी उत्तम पर्याय आहे. 

सोजीच्या पोळीची रेसिपी वर्धा येथील गृहिणी शोभाताई मकेश्वर यांनी सांगितली आहे.

1 वाटी सोजी, 2 वाटी कणिक, गूळ, सुंठ, मीठ, वेलचीपूड आणि तेल हे साहित्या पोळी बनवण्यासाठी लागतं. 

गरम पाण्यात गूळ विरघळून एका कढईत परतून घेतलेला सांजावर गुळाचं पाणी गाळून घ्यायचं. 

त्यात सुंठ, वेलची पावडर आणि मीठ ऍड करून हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. 

मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर चुरून पोळी बनवण्यासाठी त्याचे झोटे गोळे बनवून घ्यायचेत. 

आता कणकेचा गोळा थोडासा लाटून घेऊन त्यात सोजीचा गोळा टाकून चांगलं बंद करायचं आहे. 

पुरणपोळी प्रमाणे भाजून घेतल्यास सांजा पोळी खूप स्वादिष्ट लागते. रेसिपी घरीही ट्राय करू शकता. 

ही औषधी वनस्पती आहे कॅन्सरवर प्रभावी!