आता आप्पेपात्रात बनवा रोडगे
आता आप्पेपात्रात बनवा रोडगे
विदर्भात रोडगे हा खवय्यांच्या खास जिव्हाळ्याचा आणि आवडीचा पदार्थ आहे.
वर्ध्यातील गृहिणी मीना शिंदे यांनी रोडगे बनवण्याची रेसिपी सांगितली आहे.
रोडगे म्हणजेच पानगे बनविण्यासाठी शेणाच्या गोवऱ्या अतिशय महत्त्वाच्या आहेत.
सध्या गोवऱ्या ग्रामीण भागातच उपलब्ध होत असल्याने हा पदार्थ त्याच ठिकाणी बनवला जातो.
आणखी वाचा
हेडलाईनवर क्लिक करा.
हिवाळ्यात केस गळतीनं त्रस्त आहात? फॉलो करा या घरगुती टिप्स
थंडीत त्वचा कोरडी पडतेय? या सोप्या टिप्सने होईल मोठा फायदा
डासांच्या कटकटीतून मुक्ती हवीय? अंगणात लावा ही झाडे
आता शहरातील लोकही आप्पेपात्रात रोडगे बनवू शकतात.
एक ग्लास गव्हाच्या पिठात पाऊण ग्लास रवा मिक्स करावा.
त्यात चवीपुरते मीठ, चमचाभर जिरे, ओवा, तसेच खाण्याचा सोडा आणि मोठा चमचाभर तेल घालावे.
सर्व मिश्रण एकत्र करून कडकसर भिजवून घ्यावे व त्याचे पोकळ गोळे तयार करून घ्यावेत.
आप्पेपात्रात तेल गरम करून घेऊन त्यात मंच आचेवर तांबूस रंग येईपर्यंत गोळे भाजून घ्यावे.
15 मिनिटांत तयार होणारे कुरकुरती रोडगे वांग्याच्या भाजी सोबत सर्व्ह करावेत.
खिमा घोटाळा कधी खाल्लाय का?