विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवणार शाळा!

शाळा ही आपल्याला संस्कार देते, समाजात माणूस म्हणून कसे जगायचे याची शिकवण देते.

सुक्षिशित आणि सुसंस्कृतही बनवते. प्रत्येकाच्या मन पटलावर शाळा शब्द कोरलेला असतो.

कितीही उंच भरारी घेतली तरी शाळा हा शब्द काढताच आठवणीची अत्तर कुपी आपसूकच सुगंध देऊन जाते.

विद्यार्थ्यांचं बालपण सुखाचं जावं म्हणून प्रत्येक शाळा झटत असतात.

डोंबिवलीतल्या शाळेनंही विद्यार्थ्यांसाठी एक खास उपक्रम सुरू केला आहे.

‘वाचाल तर वाचाल’ या म्हणीचा अर्थ विद्यार्थ्यांना समजावा यासाठी डोंबिवलीतील विद्या निकेतन शाळेने पुढाकार घेतलाय.

विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन वाढावे यासाठी त्यांनी शाळेतच ग्रंथालय सुरू केलंय.

मोबाईलच्या अती वापरापासून मुलांनी स्वत:ला दूर ठेवावे.

वाचन चळवळ सुरू व्हावी या हेतुनं ही लायब्ररी सुरू केलीय, अशी माहिती शाळेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी दिलीय.

ZP च्या विद्यार्थ्यांना नव्या जगाचं ज्ञान !