विराट कोहली ने तोडला सचिनचा रेकॉर्ड

विराट कोहली ने तोडला सचिनचा रेकॉर्ड

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये शतक पूर्ण केलं आहे.

विराटचे वनडे क्रिकेटमधील कारकिर्दीतील हे 50 वे शतक आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे.

विराटने सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मोडला आणि 50 शतक झळकावलं

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 शतके झळकावली आहेत. त्यापैकी 49 शतके वनडे आणि 51 शतके कसोटी क्रिकेटमधील आहेत.

विराट कोहलीने 279 व्या डावात 50 एकदिवसीय शतके पूर्ण केली आहेत.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात विराट कोहलीने 117 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत कोहलीने अनेक मोठे विक्रम केले

कोहली आता एका क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

या विक्रमी आणि ऐतिहासिक खेळीनंतर खुद्द सचिन तेंडुलकरनं ट्विट करत विराटचं अभिनंदन केलं.

यामुळे विराट आता 50 शतक करणारा जगात एकमेव भारतीय ठरला आहे