विराट कोहली  आणि त्याचे 12 टॅटू

विराट कोहलीने आपला पहिला टॅटू त्याची आई सरोजच्या नावाने काढला. हा टॅटू त्याच्या डाव्या हातावर वरच्या बाजूला बनवण्यात आला आहे.

विराट कोहलीच्या वडिलांचे नाव प्रेम कोहली होते. त्याच्या हाताच्या मागील बाजूस त्याच्या वडिलांच्या नावाचा टॅटू काढलेला आहे.

विराट कोहली हा भगवान शिवचा भक्त आहे.  त्यामुळे त्याच्या डाव्या हातावर शिवाचा टॅटूही आहे. यामध्ये भगवान शिव  कैलास पर्वतावर ध्यान करताना दाखवले आहेत.

भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो 175 वा खेळाडू ठरला. त्यामुळे त्याचा वनडे कॅप क्रमांक 175 आहे.

डाव्या हातावर जपानी समुराई योद्धाचा  टॅटू काढलेला आहे. या जपानी सामुराईच्या हातात तलवार आहे. विराट या टॅटूला  आपले 'गुड लक' मानतो.

कोहलीने जून 2011 मध्ये किंग्स्टन येथे  वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि तो 269 वा खेळाडू ठरला.  त्यामुळे त्याचा कॅप क्रमांक 269 आहे.

विराटच्या खांद्यावर डोळ्याचा टॅटू आहे.  कोहली म्हणाला होता की, "मी याला देवाचा डोळा म्हणतो. या टॅटूचा अर्थ  ब्रह्मांड आहे. जो डोळ्यासारखा दिसतो.

विराट कोहलीची राशी वृश्चिक आहे, त्याने उजव्या हातावर आपल्या राशीचा टॅटू काढला आहे.

विराटने ओमचा टॅटूही बनवला आहे. तो ओम या कर्णमधुर आवाजाला जीवनाचे सार मानतो.

विराटच्या उजव्या हाताच्या मनगटावर आदिवासीच्या चिन्हा सारखा टॅटू आहे. त्याचा अर्थ टोळी, संघाचे प्रतीक आहे.

विराटच्या एका हातावर जपानी मंदिराची मारुती असलेला एक टॅटू आहे.

विराटने  उजव्या हातावर हा नवा टॅटू काढला असून याची डिझाईन फुला प्रमाणे आहे. या  टॅटूचा अर्थ आध्यात्माशी संबंधित असल्याच सांगण्यात येत आहे.