भरतनाट्यम नृत्य करत वैजयंतीमालानी साजरा केला 90 वा बर्थडे!
भरतनाट्यम नृत्य करत वैजयंतीमालानी साजरा केला 90 वा बर्थडे!
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेत्रींपैकी एक म्हणजेच वैजयंतीमाला.
देवदास, मधुमती, गंगा जमना, संगम, नेता, आम्रपाली अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले.
वैजयंतीमाला यांच्या सौंदर्यावर प्रेक्षक फिदा होते.
वैजयंतीमाला यांनी सुमारे २१ वर्षे बॉलिवूडमध्ये वर्चस्व गाजवलं.
आपलं सौंदर्य आणि दमदार अभिनयासोबतच वैजयंतीमाला त्यांच्या नृत्यशैलीसाठी ओळखल्या जायच्या.
त्या भरतनाट्यम या नृत्यप्रकारात पारंगत आहेत.
नुकतंच वैजयंतीमाला यांनी आपला 90 वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आपल्या 90व्या वाढदिवशी वैजयंतीमाला यांनी भरतनाट्यम नृत्य सादर केला.
या वयातील त्यांचा फिटनेस पाहून चाहते चकित झाले आहेत.