आजकालच्या तरुणांकडे कल्पनांची कमी नाही. आपलं काम उत्कृष्टरित्या करण्यासाठी नवनवीन संकल्पनांची जोड देत असतात.
अशाच प्रकारे वर्ध्यातील बी.कॉम चिवडेवाला सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.आपल्या चिवड्याच्या स्टॉलचे नाव काहीतरी नवीन असावं असं गौरव नांदने याला वाटत होतं.
अशातच त्याची डिग्री पूर्ण झाली त्याने बी.कॉम पूर्ण केलं आणि चक्क डिग्रीचच नाव या चिवड्याच्या स्टॉलला दिलं आहे.
त्यामुळे ग्राहक देखील स्टॉलकडे आकर्षित होताना दिसत आहेत.
गौरव दिलीप राव नांदने असं या तरुणाचं पूर्ण नाव आहे. अवघ्या 22 वर्षांच्या वयात तो बी.कॉम चिवड्याचे नाव मोठं करतोय.
याबद्दल माहिती देताना गौरव याने सांगितले की, माझं बी.कॉम झालं आहे.
जर मी खाजगी नोकरी केली असती तर मिळणाऱ्या पगारात मी समाधानी नसतो, हे मला माहीत होते.
जर मी खाजगी नोकरी केली असती तर मिळणाऱ्या पगारात मी समाधानी नसतो, हे मला माहीत होते.
त्यामुळे नोकरीतून मिळणाऱ्या पगरापेक्षा मी माझ्या व्यवसायातून जास्त मिळकत कमावतो आहे. आणि माझ्या व्यवसायाचा मी स्वतः मालक असावा असं मला वाटत होतं.
त्यामुळे मी चिवड्याच्या व्यवसायाला प्राधान्य देत बी.कॉम हे नाव ठेवत पुढे नेत आहे.