कोकणातील अधिकाऱ्यानं वर्ध्यात उभारलं शिवमंदिर

कोकणातील अधिकाऱ्यानं वर्ध्यात उभारलं शिवमंदिर

सध्या सुरू असणाऱ्या श्रावण महिन्यात विविध ठिकाणच्या शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी दिसून येते. 

वर्धा शहरात ब्रिटिशकालीन महादेव मंदिर असून ते वर्धेकरांचं श्रद्धास्थान आहे. 

या शिवमंदिराच्या निर्मितीची कथा खास असून मंदिराचे सचिव सुधीर दोंदे यांनी माहिती दिलीय. 

वर्ध्याचं जुनं नाव पालकवाडी होतं आणि इथं महादेवाचं एकही मंदिर नव्हतं. 

ब्रिटिश काळात बेदूरकर नावाचे एक शिवभक्त अधिकारी वर्धा येथे बदली होऊन आले होते. 

मुळचे कोकणातील असणाऱ्या बेदुरकर यांनी वर्ध्यातील निर्जन जागेवर महादेव मंदिर उभारलं. 

मंदिर बांधण्यासाठी खोदकाम सुरू असताना स्वयंभू शिवलिंग तिथे सापडलं.

मंदिरात औदुंबराच्या झाडाच्या सभोवताली ज्योतिर्लिंगे प्रतिष्ठापित करण्यात आलेली आहेत. 

मंदिरात 250 किलोचे पितळचे त्रिशूळ असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

अर्ध्या तासात विरघळेल बाप्पांची मूर्ती