विद्यार्थ्यांचा एस्ट्रो क्लब घडवतोय क्रांती

विद्यार्थ्यांचा एस्ट्रो क्लब घडवतोय क्रांती

विज्ञान विषयामध्ये विद्यार्थ्यांची रुची वाढावी यासाठी वर्ध्यातील महाविद्यालयात अनोखी युक्ती वापरलीय.

'बजाज कॉलेज ऑफ सायन्स'मध्ये विद्यार्थ्यांचा एस्ट्रो क्लब स्थापन करण्यात आला आहे. 

एस्ट्रो क्लबचा प्रवास 12 ऑगस्ट 2017 सुरू झाल्याचे समन्वयक डॉ. सुधीर टिपले सांगतात. 

एस्ट्रो क्लब सेल्फ फंडेड असून विद्यार्थीच क्लबचे काम सांभाळतात. 

एस्ट्रो क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना वाव देण्याचं काम होत आहे. 

2017 मध्ये फिजिक्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली टेलिस्कोप तयार केला.

हा टेलिस्कोप आताही विज्ञान विषयाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासण्यासाठी उपयोगी ठरतोय. 

पूर्वी हा टेलिस्कोप विदर्भातील सर्वात मोठा टेलिस्कोप असल्याचे डॉ टिपले सांगतात.