नव्वदीतही आजोबांची गाडी सुसाट
नव्वदीतही आजोबांची गाडी सुसाट
आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या नव्वदीपार आजोबांना पाहून असं कधी वाटलंय का की, वय फक्त आकडा आहे.
वर्धा येथे असेच 90 वर्षांचे एक आजोबा असून त्यांची कमालीची ऊर्जा पाहून अनेकांना धक्का बसेल.
नव्वदीपार असतानाही प्रभाकर गुलाबरावजी उघडे आजोबा स्कूटर सहजतेने चालवतात.
आजोबांची स्मृती या वयातही तेज असून त्यांचा वाचनाचा, कविता लिहण्याचा छंद अद्याप कायम आहे.
आजोबांनी अनेक कवितांचा संग्रह केला असून ते विविध सामाजिक उपक्रमांत आघाडीवर असतात.
आजोबांचा मुलगा हयात नसल्याने त्यांच्या घरी सुनबाई आणि एक नातू आहे.
आजोबा याही वयात अनेक काम करतात, चालतात, फिरतात आणि घरही सांभाळतात.
तब्येतीची फार तक्रार नसून आपली ऊर्जा ही देवाची देण असल्याचं आजोबा सांगतात.
विशेष मेहनत न घेता या वयातील आजोबांची फिटनेस आणि स्मरणशक्ती बघून वर्धेकर थक्क होतात.
मोबाईल पासून दूर राहत मैदानात खेळ खेळण्याचा सल्ला आजोबा आताच्या तरुणाईला देतात.