परसबागेत फुलली शिक्षणाची बाग

विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या पलीकडे वेगवगेळ्या उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण देण्याची आजच्या काळाची गरज आहे.

त्यामुळे वर्धा जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात येणाऱ्या लिंगापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये परसबाग तयार करण्यात आली आहे.

यामधून विद्यार्थ्यांना शेतीविषयक आणि भविष्यवेधी शिक्षण देऊन सक्षम बनवण्याचा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 लिंगापूर येथील जि. प. प्राथमिक शाळेत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या परिश्रमातून प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान अंतर्गत सुंदर परसबाग तयार करण्यात आली आहे.

या परसबागेत पालक, मेथी, कोथिंबिर, वांगी, टोमॅटो, मुळा, लवकी, गाजर, काकडी, फुलकोबी, मिरची अशा एकूण 21 प्रकारच्या देशी वाणाची परसबागेत लागवड करण्यात आलीय.

सर्व प्रकारच्या भाज्यांचा उपयोग शालेय पोषण आहारात करण्यात येत असल्यामुळे मुलांना विषमुक्त भाजीपाला उपलब्ध होण्यास मदत होत आहे.

या उपक्रमामुळे मुलांना नैसर्गिक शेतीचे धडे मिळत असून, शेतीविषयक नवनवीन तंत्राची माहिती मिळत आहे.

पुण्यात चक्क निळ्या तांदळाची शेती