वजन कमी करण्याचा नवा फंडा

वजन कमी करण्याचा नवा फंडा

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे व्यायाम आणि आहार पद्धती अवलंबल्या जातात. 

यात आणखी एक भर पडली असून अनेकजण वजन कमी करण्यासाठी म्युझिक योगा करत आहेत. 

म्युझिक योगा म्हणजे इन्स्ट्रुमेंटल गाण्यांवर ठेका धरून संपूर्ण शरीराचा व्यायाम करणे होय. 

वर्धा येथील म्युझिक योगा प्रशिक्षक निकिता बुरांडे म्यूझिक योगाचे मोफत प्रशिक्षण देत आहेत. 

म्यूझिक योगामध्ये झुंबा पद्धतीचाही वापर केला जात असून तशा काही स्टेप्स केल्या जातात.

डान्स योगा किंवा म्युझिक योगाचा शरीरासाठी चांगला फायदा होतो. 

योगा नृत्यामुळे थायरॉईड, ब्लड प्रेशर, वजन वाढ आदी समस्यांवर आराम मिळतो, असं बुरांडे सांगतात. 

योगाच्या माध्यमातून सर्वांनी शारीरिक आणि मानसिक रित्या स्वस्थ राहण्याची गरज आहे.