कोळशासारखं दिसतं या नदीचं पाणी, काय आहे कारण?
निसर्ग आणि त्याचे चमत्कार कायमच लोकांना आश्चर्यचकित करत असतात.
अशीच एक नैसर्गिक निर्मिती आफ्रिकन देश कॉंगामध्ये आहे.
शास्त्रज्ज्ञांना येथे एक नदी सापडली आहे, जिचं पाणी कोळशासारखं काळं आहे.
काळी पाणी असलेल्या नदीचं नाव 'रुकी नदी' आहे.
ही नदी जगातील सर्वात खोल नदीपेक्षाही 1.5 पट जास्त खोल आहे.
शास्त्रज्ज्ञ या नदीला जंगलातील चहादेखील म्हणतात.
या नदीचं पाणी काळं का आहे याविषयी शास्त्रज्ज्ञांनी संशोधन केलंय.
पर्जन्यवृष्टीतील विद्राव्य सेंद्रिय पदार्थांमुळे पाण्याचा रंग काळा झाल्याचं समोर आलं.