लग्नानंतर का बदललं जात मुलीचं नाव?
सध्या लग्नाचे शुभ मुहूर्त असल्याने अनेक जोडपी लग्नबंधनात अडकत आहेत.
लग्नानंतर मुलीचं नाव बदलण्याची प्रथा विविध समाजात अनेक वर्षांपासून सुरु आहे.
काही ठिकाणी केवळ मुलींचं आडनाव बदललं जात तर काही ठिकाणी मुलीच संपूर्ण नाव बदलण्याची प्रथा असते.
सिंधी समजात, लग्नानंतर मुलीला तिचे आडनावच नाही तर पूर्ण नावही बदलावे लागते.
सिंधी समाजात लग्न तेव्हाच पूर्ण मानले जाते जेव्हा मुलीचे नवीन नाव पतीच्या नावाशी जोडले जाते.
लग्न म्हणजे एखाद्या मुलीसाठी नवीन जन्म झाल्यासारखा असतो, अशी मुलीचे नाव बदलण्यामागची धारणा आहे.
लग्नानंतर मुलीला तिचे जुने घर परके होते आणि सर्वात आधी तिच्या पतीचे तिच्याशी असलेले नाते महत्त्वाचे असते.
अशा परिस्थितीत, नववधू नवीन नाव आणि ओळख घेऊन या नवीन जीवनात पाऊल ठेवते.
काळानुसार प्रत्येक समाजाच्या चालीरीतींमध्ये बदल होत गेले. तसेच लग्नानंतर हळूहळू मुलींची नाव आणि आडनाव बदलण्याची परंपरा कमी होत चालली आहे.