लग्नात सप्तपदीला (सात फेरे) का आहे इतकं महत्त्व?

विवाह संस्कार हा सनातन धर्माच्या 16 संस्कारांपैकी एक आहे.

लग्न करताना 7 फेऱ्या मारणे (सप्तपदी) हा देखील एक महत्वाचा विधी मानला जातो.

सप्तपदी आणि त्याच्या वचनाबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

सनातन धर्मात पती-पत्नीच्या नात्याचे वर्णन सात जन्मांचे नाते असे केले आहे.

ज्याप्रमाणे अग्नीचे सात रंग असतात, भगवान सूर्याच्या रथाला सात घोडे असतात.

बरोबर त्याचप्रमाणे लग्नात सात वचन घेतले जातात.

लग्नात पती-पत्नी सात फेरे घेतात ज्यात पत्नीला सात वचने दिली जातात.

मनुष्य सात जन्म या सात चक्रांतून जात असतो.

या कारणास्तव वधू-वरांना सात जन्मांचे सोबती असेही म्हटले जाते.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही