धनु - हा आठवडा सुख आणि सौभाग्य देईल. छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास या आठवड्यात तुमच्या आयुष्यात आणि घरात आनंदाचं वातावरण असेल. नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
कुंभ - या आठवड्यात नशीबाची साथ मिळेल. तुमच्या जवळच्या मित्रांच्या मदतीने तुम्ही आयुष्यातील सर्वात मोठ्या समस्या सोडवू शकाल. आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसाय वाढवण्याच्या योजना यशस्वी होतील. विशेष म्हणजे हे करताना तुम्हाला काही प्रभावशाली व्यक्ती आणि कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल.