लवंग खाण्याचे आश्चर्यकारक फायदे पाहा 

लवंग हा सर्वसाधारण मसाल्याचा पदार्थ. हा पदार्थ जवळपास सर्वच जेवणात वापरला जातो.

या पदार्थाला स्वतःची एक वेगळी चव आहे. मात्र असे असले तरी अनेक वेळा हा पदार्थ जेवताना बाजूला काढला जातो.

मात्र ही लवंग बाजूला काढण्यापेक्षा जर ती खाल्ली तर त्याचा शरीराला कोणता फायदा होतो याची माहिती डोंबिवलीतील डॉ. श्रेयस कळसकर यांनी दिली आहे.

लवंगमुळे पोटाचे त्रास दूर होतात. अपचन होऊ नये म्हणून हा पदार्थ जेवणात वापरला जातो.

पोटफुगी देखील यामुळे कमी होते. पोटदुखी होत असेल तर त्याचा चांगला वापर होतो,असं श्रेयस कळसकर सांगतात.

दात दुखण्यावर हे एक उत्तम औषध असून लवंगीच तेल किंवा लवंग धरली जाते. 

त्यामुळे दातांना आणि हिरड्यांना आराम मिळतो, अशी माहिती कळसकर यांनी दिली.

तोंडातील रोग कमी होतात. तोंडातील चिकटा कमी करण्याचे काम लवंग करते. यामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते.

बिर्याणी हे पचायला जड असणारा पदार्थ आहे. जो पदार्थ पचायला जड आहे अशा जेवणात लवंग हमखास टाकली जाते, असं कळसकर सांगतात.

कॅन्सरवर बेस्ट उपाय म्हणजे ही पाने