हार्टअटॅकचं कारणं ठरतं वाढलेलं कोलेस्ट्रॉल, पाहा काय दिसतात लक्षणं?
कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरातील आवश्यक तत्व असतं.
याचे प्रमाण नेहमीच सामान्य असायला हवं.
कोलेस्ट्रॉल लेव्हल नॉर्मलपेक्षा जास्त असणं हानिकारक असतं.
हे जास्त वाढले तर हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
आता प्रश्न येतो की, कोलेस्ट्रॉल वाढवल्यावर काय लक्षणं दिसतात.
CDC नुसार कोलेस्ट्रॉल वाढल्याचे काहीच लक्षणं नाही.
याची माहिती घेण्यासाठी ब्लड टेस्ट करावी लागते.
लक्षणं दिसत नसल्याने याला सायलेंट किलर म्हणतात.
लोकांनी वेळोवेळी याची चाचणी करायला हवी.