ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कॅन्सरचा प्रकार आहे.
या कॅन्सरची लक्षणं सुरूवातीलाच दिसू लागतात. त्यानंतर तातडीनं डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे.
ही लक्षणं नेमकी कोणती याबाबत डोंबीवलीच्या अनिल हॉस्पिटलमधील कॅन्सर स्पेशालिस्ट डॉ. अनिल हेरूर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
स्तनाला गाठ आली असेल तर दुर्लक्ष करू नका. ही गाठ दुखणारी नसते.
स्तनातून रक्तस्राव होणे किंवा काळ्या रंगाचा स्त्राव बाहेर पडणे. स्तनावरील त्वचा लाल होते. दडदडीत होते. संत्र्याच्या सालीसारखी दिसते.
महिलांनी ब्रेस्ट कॅन्सरबाबत सावध राहणे आवश्यक असून त्यांनी सुरुवातीला स्वत:ची तपासणी स्वत: करावी, असं डॉ. हेरुर यांनी सांगितलं.
त्यानंतर निपल्सला दाबून बघावे. त्यातून कोणता स्त्राव येत असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवणे गरजेचं आहे,’ असं हेरूर यांनी सांगितलं.