रात्री झोपताना किती डिग्रीवर चालवावा AC?

सध्या उकाडा वाढत असून यापासून आराम मिळवण्यासाठी अनेकजण आपल्या घरी एसी किंवा कुलरचा वापर करतात.

दिवसा जाणवत असलेल्या उकाड्यानुसार दिवसभर लोक घरातील एसीचे टेम्परेचर कमी जास्त करत असतात.

परंतु रात्री एसीचे टेम्परेचर किती ठेवावे याबाबत अनेकजणांना प्रश्न पडतो.

ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सीच्या सांगण्यानुसार एसीचे टेम्परेचर 24 डिग्रीवर ठेवावे.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा

24 डिग्री टेम्परेचर हे मानवी शरीरासाठी योग्य ठरत.

तसेच यामुळे वीजबिल देखील जास्त येत नाही.

एसी सोबत पंखा सुरु ठेवल्याने एसीची हवा संपूर्ण खोलीत पसरायला मदत होते.

एसी सुरु असताना फॅन 1 किंवा 2 वर ठेवावा.

रात्री एसी सुरु करताना त्याला टायमर लावावा जेणेकरून रात्री एसी काहीतास चालून बंद होईल.

रात्री एसी लावताना घराच्या खिडक्या बंद कराव्यात, ज्यामुळे खोली थंड होईल.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा