टोल टॅक्सच्या पैशांचं काय करते सरकार?

रस्त्याने जाताना जागोजागी टोल लागलेला असतो. टोलवर लोकांकडून टॅक्स वसूल केला जातो.

लोकांकडून वसूल केलेला हा संपूर्ण टोल टॅक्स सरकारकडे जातो.

तुम्ही कधी विचार केलाय का, टोल टॅक्समधून मिळणाऱ्या या पैशांचं सरकार काय करते? हा पैसा नेमका जातो कुठे? 

हायवेवर वाहनांकडून टोल वसूल केला जातो. टोल टॅक्स भरणं अनिवार्य असतं.

2023-2024 मध्ये 48,028 कोटींचा टोल टॅक्स वसूल करण्यात आला.

टोल टॅक्समध्ये गोळा केलेला पैसा सरकार रस्त्यांच्या कामांसाठी वापरते. 

रस्त्याचं दुरुस्तीकरण, हायवे बनवण्यासाठीही हे पैसे वापरले जाते.

पूल आणि ओव्हरब्रिजही याच पैशांमधून बांधला जातो. याशिवाय रस्त्यावर लागणाऱ्या लाईट आणि साफ-सफाईसाठी पैसा यातूनच जातो.

वाहनांकडून टोल टॅक्स वसूल करण्यासाठी हायवेवर ठिकठिकाणी हे टोल कलेक्ट प्लाजा असतात.