फळांवर लावलेल्या स्टीकरचा काय असतो अर्थ?

फळं आरोग्यासाठी फायदेशीर असतात, त्यामुळे डॉक्टरही त्याचं सेवन करण्यास सांगत असतात. 

तुम्हीही रोज फळं खात असाल मात्र फळांविषयी एक गोष्ट तुम्ही कधी नोटीस केली का?

तुम्ही मार्केटमधून फळं खरेदी करता तेव्हा त्यावर छोटे स्टीकर असतात. मात्र फळांवर हे छोटे स्टीकर का लावले जातात? 

फळांवरचे स्टीकर नीट पाहिले तर त्यावर काही नंबर्स लिहिलेले असतात. स्टीकरवर नंबर लिहिण्याचाही एक अर्थ असतो.

फळांच्या स्टीकरवर असलेला नंबर, कोड फळांची गुणवत्ता दर्शवतो.

स्टीकरवर असलेले नंबर किती अंकी आहे आणि त्याची सुरुवात कशापासून होते यावरुन फळांची गुणवत्ता समजते.

जर स्टीकरवरील कोड 5 अंकी असेल तर फळ ऑर्गेनिक आहे. 

4 अंकी असलेले स्टीकरची फळे खरेदी केली नाही पाहिजे. कारण त्यामध्ये भरपूर केमिकल असतात.

9 पासून स्टीकरवरचा नंबर सुरु होत असेल तर जैविक पद्धतीनं फळं पिकलेली आहेत. हे फळ तुमच्यासाठी जास्त फायदेशीर असतं.