'Online' ला मराठीत काय म्हणतात?
आपण दैनंदिन आयुष्यात अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करतो.
आपल्याला या शब्दांची इतकी सवय झालेली असते की त्याचा मराठी किंवा कोणत्याही भाषेतील शब्द विचारला तर उत्तर देता येत नाही.
असाच एक शब्द आहे Online
सोशल मीडिया आल्यापासून Online या शब्दांचा वापर सारखाच ऐकायला मिळतो.
तुम्ही अनेकदा लोकांना 'मी Online नव्हतो' किंवा 'Online नाही' असं बोलताना ऐकलं असेल.
पण Online या शब्दाला मराठीत पर्यायी शब्द काय आहे हे अनेकांना माहित नसेल.
ऑनलाईन हे अनेक अर्थाने वापरलं जातं. जसं की ऑनलाईन शॉपिंग, व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इतर प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन असणं असाही अर्थ होतो.
या प्रत्येकासोबत ऑनलाईनचा अर्थही बदलू शकतो. मात्र आज आपण सोशल मीडियावर ऑनलाईन असणं याच्या अर्थाबद्दल बोलू.
सोशल मीडियावर ऑनलाईन असण्याला त्या प्लॅफॉर्मवर सक्रीय किंवा उपलब्ध असणं असंही म्हणता येतं.