माणसावर वीज पडली तर काय होतं, यापासून कसं करायचं स्वतःचं संरक्षण?
जर एखाद्या व्यक्तीवर वीज पडली तर त्याची त्वचा जळू शकते.
वीज पडून व्यक्तीचा त्वरित मृत्यू देखील होऊ शकतो.
वीज पडल्यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा हृदयाचे ठोके बंद होऊ शकतात.
अशावेळी आपत्कालीन वैद्यकीय मदतीची व्यवस्था त्वरित करावी.
विजेचा धक्का बसलेल्या व्यक्तीला ताबडतोब सीपीआर देणे हा एक प्रभावी उपाय आहे.
अशावेळी वीज पडताना घराबाहेर पडू नका
नळांना, विजेच्या वस्तूंना किंवा धातूच्या वस्तूंना स्पर्श करू नका.
तुम्ही बाहेर कुठे असाल तर लगेच मॉल किंवा इमारतीत जा.
झाडे, खांब किंवा कोणत्याही उंच वस्तूजवळ उभे राहू नका.