अनेकदा हे ऐकलं असेल की काही VIP व्यक्तींना जेलमध्ये विशेष सुरुवाधा दिल्या जातात.
पण या विशिष सुविधा म्हणजे नक्की काय असतं तुम्हाला माहितीय?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार जेलमध्ये बंद आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हा प्रश्न उपस्थीत होत आहे.
केजरीवाल यांना घरातील जेवण खाण्यासाठी परवानगी आहे. त्यांच्यासाठी रोज घरातून ताजं जेवण येतं.
ते डायबिटीक पेशंट असल्यामुळे त्यांना शुगरफ्री चहा देखील जेलमध्ये मिळते.
तुरुंगात त्याचं स्टेटस VIP कैद्यासारखं आहे की नाही हे माहित नाही.
परंतु जेल मॅन्युअलमध्ये असे म्हटले आहे की जर एखादा मंत्री आर्थिक गुन्ह्यांच्या प्रकरणात तुरुंगात असेल, तर त्याला VIP कैदी मानले जाऊ शकते.
VIP व्यक्तीना टेबल, स्टूल, वर्तमानपत्रे, झोपण्यासाठी लाकडी पलंग, एक कार्पेट, एक सुती चादर, मच्छरदाणी, एक जोडी चप्पल, एक कुलर, बाहेरील अन्न आणि कारागृहात वेगळे अन्न बनवून देण्याचा समावेश आहे.
एका सामान्य कैद्याला जेवणासाठी प्लेट आणि ग्लास, तसेच झोपण्यासाठी चटई आणि ब्लँकेट देतात.