एक महिना बटाटे खाणं बंद केलं तर?  होईल असा परिणाम

बटाटा हा असा पदार्थ आहे जो जवळपास प्रत्येक भाजीत टाकला जातो.

परंतु जर जेवणात महिनाभर बटाट्याचे सेवन टाळले तर आरोग्यावर कसा परिणाम होईल ते पाहा.

बटाट्यामध्ये स्टार्च असते ज्यामुळे तो ऊर्जेचा उत्तम स्रोत मानला जातो. बटाट्यात कॅलरीज सुद्धा जास्त असल्याने बटाटा खाणे बंद केल्यास वजन कमी होईल.

बटाट्यातील स्टार्चमुळे रक्तातील साखर वाढण्यास मदत होते. तेव्हा बटाटा खाणे टाळल्यास ब्लड शुगर नियंत्रित राहील.

बटाटा खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो.

बटाट्याचे पदार्थ खाणे टाळल्याने हृदयासंबंधित आजारांचा धोका कमी होईल.

बटाटा खाणे टाळल्यावर पचन क्रिया सुधारेल.

बटाट्यात व्हिटॅमिन सी असल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. पण बटाटे खाणे बंद केल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.

बटाट्यात कार्बोहायड्रेट, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, फायबर, सह अनेक पोषक घटक असतात. तेव्हा बटाटे न खाल्ल्याने शरीरात या पोषक तत्वांची कमतरता जाणवते.

सदर माहिती ही इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा यानुसार आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.