एक महिना दूध प्यायलं नाही तर काय होईल?

दूधात अनेक पोषक तत्व असल्याने दूध पिणे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते.

पण तुम्हाला माहितीये का? दूध पिण्याचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत.

तेव्हा दूध कोणत्या लोकांनी पिवू नये आणि दूध प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात हे जाणून घेऊयात.

काहीजणांना मायग्रेनचा त्रास होतो. दूधात टायरमाईन नावाचा घटक असतो.  ज्यामुळे मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांच डोक दुखत.

जास्त दूध प्यायल्याने ब्लोटींगची समस्या होऊ शकते. त्यामुळे पोट फुगणे सारखी समस्या होते. तेव्हा दूध प्यायले नाही तर ही समस्या दूर होऊ शकते.

काही लोकांना डेअरी प्रोडक्टमुळे शरीरात सुज येते. तेव्हा दूध न प्यायल्याने ही समस्या दूर होऊ शकते.

दूध प्यायले त्वचा जास्त ऑइल प्रोड्युस करते. त्यामुळे पिंपल्सची समस्या होऊ शकते. दूध न प्यायल्यास समस्या दूर होऊ शकेल.

गायीच्या दूधात एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन सारखे हार्मोन भरपूर प्रमाणात आढळतात. हे हार्मोन्स जेव्हा शरीरातील इतर हार्मोन्सशी मिळतात त्यावेळी ते मूड अॅम्पिमेट करण्याच काम करतात.

डेअरी प्रोडक्टमध्ये नॅचरल शुगर असते त्यामुळे वजन वाढते. तेव्हा जर दूध प्यायलं नाही तर वजन नियंत्रणात येऊ शकेल.

(सदर माहिती ही इंटरनेटवरून मिळालेल्या मजकुरावर आधारित आहे. त्यामुळे आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)