मानव आणि जीवजंतूं प्रमाणे सूर्यालाही एक ना एक दिवस नष्ट व्हावेच लागते.
मग विचार करा आपल्या ऊर्जा आणि प्रकाश देणारा सूर्य विझला तर पृथ्वीवर काय होईल?
सुमारे ५ अब्ज वर्षांनंतर हे घडेल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
सूर्य नष्ट झाल्यानंतर 8 मिनिटांनी पृथ्वीवर संपूर्ण अंधार होईल.
जर रात्रीची वेळ असेल, तर तुम्हाला असे दिसेल की चंद्र अचानक नाहीसा झालेला असेल.
सूर्याच्या उष्णतेशिवाय पृथ्वी लवकरच जास्त थंड होईल.
पृथ्वीचे सरासरी तापमान दोन आठवड्यांत 0ºF च्या खाली जाईल.
एका वर्षात तापमान -100ºF पर्यंत खाली येईल, महासागर गोठतील.
त्यानंतर माणसं आणि जीव-जंतूंचा नाश होईल आणि पृथ्वी एक बर्फाचा गोळा बनून राहिल