लग्नांबरोबरच आता पुढील काही महिन्यांमध्ये साखरपुड्याचीही अनेकांना आमंत्रणं असणार.
मात्र या कार्यक्रमांच्या आमंत्रणांदरम्यान अनेकदा 'आमंत्रण' आणि 'निमंत्रण' असे 2 वेगळे शब्द तुम्हाला अनेकदा ऐकायला मिळतात.
पण या 2 शब्दांचा अर्थ सारखाच आहे की वेगळा? हे जाणून घेऊयात.
सामान्यपणे असं मानतात की ज्या कार्यक्रमाची काही विशेष रुपरेषा नसेल आणि ज्यांना कार्यक्रमाला बोलावलं आहे त्यांनी कधीही आपली उपस्थिती दर्शवली तरी हरकत नसते अशावेळेस आमंत्रणं दिलं जातं.
जेव्हा एखाद्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरलेली असते आणि त्यातील कार्यक्रम एका विशिष्ट वेळीच पार पडणार असतो. अशा प्रकारच्या बोलवण्याला निमंत्रण असं म्हणतात.
उदाहरणासहीत सांगायचं झालं तर लग्नाचं रिसेप्शन किंवा वाढदिवसाच्या पार्टीचं आमंत्रण असतं.
तर लग्नसमारंभ किंवा मुंज यासारख्या कार्यक्रमांसाठी निमंत्रण पाठवलं जातं.