Highway आणि Expressway एकच नाही, आहे खूप फरक

देशात अनेक रस्त्यांंचं बांधकाम सुरु आहे, जे तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमी वेळेत पोहोचवण्याचं काम करतात.

पण रस्त्यांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, ज्यामध्ये एक्सप्रेस वे आणि हायवेचा समावेश आहे. अनेकांना हे दोन्ही सारखेच वाटतात. पण यामध्ये आहेत मोठे फरक

हायवेवर कुठूनही एन्ट्री आणि एक्जिट करता येते, पण एक्स्प्रेस वेचं असं नाही

तर एक्सप्रेस मार्गावरील प्रवेश आणि बाहेर निघणे हे कुठूनही शक्य नाही, ते नियंत्रीत केले जातात.

महामार्गापेक्षा एक्स्प्रेसवेवर वाहने जास्त वेगाने जातात.

द्रुतगती मार्ग देखील महामार्गांपेक्षा जास्त उंचीवर बांधले जातात.

महामार्ग सामान्यतः 2 किंवा 4 लेनचे बनलेले असतात, तर एक्सप्रेसवे 16 लेनचे बनलेले असतात.

हायवे रस्ता मोकळा आहे, त्यावरून प्राणी वगैरेही ये-जा करत असतात.

एक्स्प्रेस वेला दोन्ही बाजूंनी रेलिंगने वेढले आहे, त्यामुळे प्राणी वगैरे आत जात नाहीत.

द्रुतगती मार्गावर आपत्कालीन परिस्थितीत लढाऊ विमाने उतरवण्याचीही सोय आहे.