हेल्थ इन्शुरन्समध्ये मिळणारा नो क्लेम बोनस म्हणजे काय?
वर्षभरामध्ये तुम्ही हेल्थ इन्शुरन्स वापरलं नाही तर तुम्हाला रिवॉर्ड मिळतो.
यामध्ये इन्शुरन्स कंपनी तुम्हाला आर्थिक लाभ देत असते.
नो क्लेम बोनस हा लोकांना आरोग्य सुरक्षित करण्यासाठी प्रेरणा देत असतो.
नो क्लेम बोनसचे दोन प्रकार असतात.
पहिला क्युमेटीव्ह बेनिफीट आणि दुसरा प्रीमियममध्ये सूट दिली जाते.
पहिल्या ऑप्शनमध्ये इन्शुरन्स रक्कम वर्षानंतर वाढवली जाते.
उदा. 10 लाखांचा इन्शुरन्स कव्हर 11 लाख केला जातो.
दुसऱ्या पर्यायात विम्याचा हप्ता कमी करण्यात येतो.
तुम्हाला 20 हजारांचा हप्ता येत असल्यास तो 18 हजार केला जातो.