घराचे छत, स्लॅब घालणे, दक्षिण दिशेला प्रवासाला जाणे, लाकडी वस्तू खरेदी करणे, पलंगाची दुरुस्ती करणे किंवा पलंग तयार करणे आणि मृतदेहाचे अंतिम संस्कार करणे.
चतुर्वेदी यांनी सांगितले की, पंचक काळात प्रत्येक वाराचा वेगळा परिणाम होतो.
पंचक काळ हा अशुभ असतो. पण, ग्रहांचे संक्रमण आणि ग्रहांच्या स्थितीमुळे हा प्रभाव फक्त कमी जास्त होतो.
या पंचकामध्ये बुधवार आणि गुरुवारचे पंचक दोषमुक्त असल्याचे सांगितले जाते.
पंचक काळात एखाद्याच्या मृत्यू झाला, तर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबरोबरच एक गवताचा पुतळा बनवून त्याच वेळी त्याचे अंतिम संस्कार करण्याची परंपरा आहे.