उन्हाळ्यात कोणत्या वेळी ताक पिणं सर्वात फायदेशीर?

उन्हाळा सुरु झाला की अनेकजण शरीराला थंडावा मिळावा म्हणून ताकाचे सेवन करतात.

उन्हाळ्यात ताक प्यायल्याने शरीराला अनेक फायदे देखील मिळतात.

तसेच योग्य वेळी ताक प्यायल्याने त्यातून शरीराला मिळणारे फायदे दुप्पट होतात.

ताकामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 12, कॅल्शियम, आयरन, फायबर, अँटी ऑक्सिडेंट, अँटी बॅक्टेरियल इत्यादी गुण आढळतात.

ताक तुम्ही कधीही पिऊ शकता, परंतु उन्हाळ्यात दुपारच्या जेवणानंतर ताक प्यायल्याने सर्वाधिक फायदा होतो.

शक्यतो संध्याकाळी किंवा रात्री ताक पिणे टाळा.

ताक प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तसेच त्यात जिरं टाकून प्यायल्यास ऍसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो.

ताक प्यायल्याने रोग प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

ताक प्यायल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.

ताकामध्ये कॅल्शियमचे चांगले प्रमाण आढळते, त्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत मिळते.

सदर मजकूर हा इंटरनेटवर लिहिलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.