थंडीत हातापायाची बोटं का सुजतात?
थंड वातावरणामुळे प्रामुख्याने आपली त्वचा, केस आणि हाडांवर परिणाम होतो.
थंडीच्या वातावरणामुळे अनेकांच्या हात-पायांवर सूज येऊ लागते.
तेव्हा यामागचे नेमके कारण जाणून घेऊयात.
थंड हवेमुळे आपल्या शरीरातील शिरा आकुंचन पावू लागतात. ज्याचा रक्ताभिसरणावर सर्वात जास्त परिणाम होतो.
हात आणि पायांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात. अशा स्थितीत बोटं लाल होऊ लागतात आणि त्यावर सूज येते.
काहीवेळा ही सूज काही वेळाने इतकी वाढते की बोटांचा रंग लाल-निळा होतो.
कोमट पाणी आणि मीठाचा वापर केल्यावर बोटांवरील सूज कमी होऊ शकते.
पाण्यात 10 मिनिटं आपले हात आणि पाय बुडवून बसल्यावर त्यावरील सूज कमी होऊ शकते.
पायाला आणि हाताला जास्त सूज येत असेल तर लसणाचं तेल वापरलं पाहिजे.
सुजलेल्या भागावर लसणाचं तेल कोमट करून लावावं. यामुळे वेदना कमी होतात.
अक्रोड तेलामध्ये असलेले पोषक घटक त्वचेच्या आरोग्यासाठी फार उपयुक्त असतात.
अक्रोड तेलामध्ये असलेलं ओमेगा -3 त्वचेच्या निर्मितीस उत्तेजन देऊ शकतं आणि दाहक त्वचा विकारांशी लढा देऊ शकतं.