एक्सपायरी डेट आणि बेस्ट बिफोरमध्ये फरक काय?
तुम्हीही पॅकेटमधील खायचं घेत असाल तर काही गोष्टी माहित असणं गरजेच्या आहेत.
पॅकेटमधील वस्तू खरेदी करण्याच्या आधी त्यावरील एक्सपायरी डेट बघणं महत्त्वाचं असतं.
अनेकांना एक्सपायरी डेटविषयी माहिती असतं. मात्र बेस्ट बिफोर किंवा युज बाय डेट हे काहींना लवकर लक्षात येत नाही.
बऱ्याच लोकांना वाटतं की बेस्ट बिफोर आणि एक्सपायरी डेटचा अर्थ एकच आहे.
एक्सपायरी डेट म्हणजे, त्या तारखेनंतर तुम्ही ते प्रोडक्ट वापरु शकत नाही.
तारखेनंतरही तुम्ही ते पॅकेटमधील प्रोडक्ट वापरत असाल तर ते तुम्हाला हानी पोहचवू शकतं.
बेस्ट बिफोर याचा अर्थ आहे, क्वालिटी इंडिकेटर.
जर तुम्ही बेस्ट बिफोरच्या डेटनंतर एखादी पॅकेटमधील गोष्ट खात असाल तर तुम्हाला ती चव आणि ते पोषक तत्व मिळणार नाहीत.
यूज बाय लिहिलेल्या तारखेनंतर काही दिवस तुम्ही त्या गोष्टी वापरु शकता. जसं की, दूध, ब्रेड.