लग्नाच्या मुहूर्ताला एवढं महत्व का असतं?

सध्या लग्नाचे अनेक शुभ मुहूर्त असल्याने बरीच जोडपी लग्नबंधनात अडकत आहेत.

लव्ह मॅरेज असोत किंवा अरेंज, प्रत्येक लग्नाचा मुहूर्त काढला जातो.

मुहूर्तावर लग्न लागण्याला अनन्य साधारण महत्व आहे.

तेव्हा मुहूर्त म्हणजे नक्की काय आणि लग्नाच्या मुहूर्ताला एवढं महत्व का दिलं जात हे जाणून घेऊयात.

हिंदू संस्कृतीमध्ये विवाह हा एक शुभ संस्कार मानला जातो.

विवाहकार्य निर्विघ्नपणे व्हावे, वधू-वरांचा भावी संसार सुखाचा व्हावा यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो.

वैदिक पद्धतीने सर्व विवाहाचा विधी अगोदर करून घेतला जातो आणि मंगलाष्टके म्हणून शुभ मुहूर्तावर वधू-वर एकमेकांना वरमाला घालतात.

विवाह मुहूर्तावर विवाह संस्कार करणे हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असतो.

पंचांगे आणि कॅलेंडमध्ये अनेकदा विवाह मुहूर्त दिलेले असतात. 

हल्ली काही ग्रंथांचा आधार घेऊन चातुर्मासातही ‘काढीव मुहूर्त’ वेगळे देण्यात येतात. अडीअडचणींच्या वेळी या काढीव मुहूर्तावर विवाह कार्ये केली जातात.